aagri recipes Archives - AgariKoli.com

चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea
आता बऱ्यापैकी गणपती गौरी विसर्जन सोहळा पार पडला आहे. बाजारात देखील मास्यांची आवक भरपूर प्रमाणात वाढली आहे. त्याप्रमाणे त्याचे भाव देखील वाढले आहेत. एक वेळ अशी येते कि पापलेट, सुरमई, रावस, दाढा , घोळ यांचे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे होतात. मग मोर्चा वळतो दुसऱ्या मास्यांकडे ज्यांचे भाव साधारण परवडणारे असतात. बोंबील, मांदेली, बांगडा, बोय, ढोमा, खाडीची कोळंबी, कुपा, मुशी, काटी, पाला इत्यादी . या मास्यांचे भाव जरी कमी असले तरी त्यांची पौष्टिकता अजिबात कमी नाहीये. बऱ्याचदा यात काटे जास्त असतात, आकाराने लहान असतात. मासे साफ करताना थोडा त्रास होऊ शकतो अर्थात सवय नसेल तर. ज्या ठिकाणी मी राहते जिल्हा पालघर , जो सागरी, नागरी आणि डोंगरी या भागात विभागला गेला आहे. त्याला ११२ किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वरील नमूद केल्याप्रमाणे एलिट कॅटेगरी ची मासेमारी केली जाते. या भागात बांगडा , कुपा अश्या मास्यांची मासेमारी होत नाही.. हे सगळे मुंबईवरून आणून इथे विकले जातात. बांगडा तरी बऱ्यापैकी या भागात खाल्ला जातो पण कुपा खाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. इंग्लिश मध्ये कुपा टुना म्हणून ओळखला जातो आणि जगभरात टुना खाण्याचे प्रमाण भरपूर आहे. टुना हे नाव कायम वाचनात येत असे पण हाच इथे कुपा या नावाने मिळतो हे समजायला मला खूप वर्ष लागली. माहेरी तर मी कधी हा कुपा पाहिला देखील नव्हता. सासरचे मांगेला (कोळी ) जरी असले तरी तिथेही कधी कुपा दर्शन झाले नाही. अंधेरीला मासे प्रक्रिया आणि मूल्यवर्धित पदार्थ याचा जेव्हा कोर्स केला तेव्हा टुना म्हणजे कुपा आणि तो आपल्या इथेहि मिळतो हे मला समजले. परंतु तिथेही कुपा खाण्याचा योग आला नाही. मग एकदा बाजारातून घेतलाच. किंमतही काही फार जास्त नव्हती. बांगड्यापेक्षा स्वस्त. कारण कुपा खाण्याचे प्रमाण पालघर भागात फार कमी आहे त्यामुळे खूप महाग असा काही प्रकार त्या बाबतीत होत नाही.

कुपा घरी आणल्यानंतर त्याचे साफ करायचे सोपस्कार केले. दिसायला हा मासा कडक जरी असला तरी यात काटे फार कमी असतात जे कि आपण सहज काढू शकतो. सर्वप्रथम त्याचे मांस काढून घेतले . काटे, डोक्याचा भाग अर्थातच कचऱ्यात. मग त्याचे लोणचे बनवले. चवीला उत्कृष्ट असे ते लोणचे झाले होते. सगळ्यांना टेस्ट करायला दिले. सगळ्यांना आवडले. खाताना कोणता मासा आपण खातोय हे मास्यांचे लोणचे खाताना सांगितल्याशिवाय समजत नाही. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला होता. नंतर पुन्हा एकदा कुपा आणला होता. त्याला मस्त फ्राय केला. आणि खरंच त्याची चव चिकन सारखी होती, मुळात काटे कमी आणि काढायला देखील सोप्पे. त्यात या कुप्याला स्वतःची चरबी असते. फ्राय करताना त्याचे ऑइल होते आणि छान प्रकारे फ्राय होतो. नवऱ्याला आवडला म्हणजे मासा परीक्षा पास. जर मासा परीक्षा नापास झाला तर पुन्हा त्याचे किचनमध्ये येण्याचे चांसेस जवळपास शून्य. अंधेरीला CIFE ला कोर्स करत असताना सरांनी सांगितले होते कि याला “चिकन ऑफ द सी” असे म्हणतात आणि ते खरेच आहे. फक्त एक काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही कधी कुपा आणाल त्याला लगेच फ्राय, कालवण करा. फ्रिज मध्ये ठेवून नंतर त्याला खाण्यात चिकन ची ती मज्जा येत नाही. जेव्हा तुम्ही फ्रेश बनवून खाल तेव्हाच तो चिकन सारखी चव देईल. काही मासे फ्रेश खाण्यातच मज्जा असते , फ्रिज मध्ये स्टोर   केल्यावर त्याची चव उतरते. कुपा हा त्यातलाच एक.

बाजारात २ प्रकारचे कुपा मासे मिळतात. लाल कुपा (रेड फिन टुना ) आणि पांढरा कुपा (व्हाईट फिन टुना). पांढरा कुपा कमी प्रमाणात मिळतो परंतु तो जास्त चविष्ट असतो. कुपा घेताना कधीही मोठ्या आकाराचा ताजा असलेला पांढऱ्या पाण्याचा बघून घ्यावा. या मास्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पौष्टिक मूल्ये आढळतात. यात ओमेगा ३ फॅटी ऍसिड , प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात. तसेच सोडियम, लोह, मॅग्नेशियम , पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, व्हिटॅमिन बी १२ , व्हिटॅमिन बी ६ याचे प्रमाण आहे. यात कोणतेही कार्बोहैड्रेट, फायबर , साखर आढळत नाही. यात फोलेट , लोह आणि बी १२ असल्यामुळे याचा उपयोग ऍनिमिया या आजारात होऊ शकतो. ओमेगा ३ फॅटी ऍसिड सोबत DHA आणि EPA असल्यामुळे यापासून फिश ऑइल सप्लिमेंट्स बनवण्यात येतात. त्याचा उपयोग ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यासाठी होतो असे अभ्यासात आढळून आले आहे. जगभरात खाण्यायोग्य कुप्याच्या ५ वेगवेगळ्या जाती आढळतात. बाहेरच्या देशात कॅन टुना मोठ्या प्रमाणात मिळतो. त्याचे कॅनिंग पाण्यात अथवा तेलात केलेले असते. अशाप्रकारे हा मासा एक ते दोन वर्षे सहज टिकतो. फ्रेश टुना खाण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. अल्बाकोर टुना, स्किपजॅक टुना, बिगाय टुना, अहि टुना आणि ब्लू फिन टुना हे प्रकार बाजारात मिळतात. त्यापैकी ब्लू फिन टुना हा प्रकार सगळ्यात महाग असतो.

तर तुम्ही देखील कधी कुपा मासा ट्राय केला नसेल तर चेंज म्हणून एकदा पाककृती करून पाहण्यास हरकत नाही. याची बिर्याणी बऱ्याच प्रमाणात बनवली जाते. यूटूब वर त्याच्या भरपूर पाककृती तुम्हाला मिळतील. मी तरी अजून कधी ट्राय केली नाहीये. पण खूप छान चविष्ट लागते असे मी बऱ्याचदा कोळी लोकांकडून ऐकले आहे. कदाचित याची चव चिकन सारखी असल्यामुळे बिर्याणी देखील चविष्ट लागत असावी.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कृपया कमेंट करून सांगा. तुमचा अभिप्राय नक्की द्या. या सारखे आणखी ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.agarikoli.com/blog/

The post चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea appeared first on AgariKoli.com.